NMMS 2025-26 First Answer Key – Download Set Wise PDF
NMMS 2025-26 परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची (First Answer Key)
NMMS 2025-26 परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची (First Answer Key) जाहीर झाली आहे. NMMS 2025-26 परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न असतो — “ माझा स्कोर किती झाला असेल ?” आणि याच कुतूहलामुळे Answer Key विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आता NMMS 2025-26 प्रथम उत्तरतालिका (First Answer Key) जाहीर झाली आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या Set Wise PDF द्वारे आपली उत्तरे तपासू शकतात आणि संभाव्य गुणांचा अंदाज लावू शकतात.
उत्तरतालिका जाहीर दिनांक : ०९/०१/२०२६
आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख : ०९/०१/२०२६ ते दि. १६/०१/२०२६ रोजी पर्यंत
अधिकृत वेबसाइट : https://www.mscepune.in व https://2026.mscenmms.in
NMMS 2025-26 MAT आणि SAT Answer Key
NMMS परीक्षेमध्ये दोन स्वतंत्र पेपर घेतले जातात – MAT (Mental Ability Test) आणि SAT (Scholastic Aptitude Test). त्यामुळे उत्तरतालिका देखील दोन्ही पेपरसाठी स्वतंत्रपणे जाहीर केली जाते.🧠 MAT (Mental Ability Test) Answer Key
MAT पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी, तार्किक विचार (Reasoning), संख्यात्मक क्षमता, आकृती विश्लेषण आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारले जातात.विद्यार्थ्यांनी MAT Answer Key डाउनलोड करून आपले उत्तर Set A, B, C किंवा D नुसार तपासावेत. या पेपरमधील गुण अंतिम निवड प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे असतात.
MAT Answer Key 2025-26 (Set Wise) – Download PDF
SAT (Scholastic Aptitude Test) Answer Key
SAT पेपरमध्ये शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. यात प्रामुख्याने: गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश असतो.
SAT Answer Key द्वारे विद्यार्थी विषयानुसार आपले गुण मोजू शकतात आणि अपेक्षित कट-ऑफशी तुलना करू शकतात.
SAT Answer Key द्वारे विद्यार्थी विषयानुसार आपले गुण मोजू शकतात आणि अपेक्षित कट-ऑफशी तुलना करू शकतात.
SAT Answer Key 2025-26 (Set Wise) – Download PDF
*टीप:* PDF वरून स्वतःचे उत्तर सेटशी जुळवून तपासा.
Objection Process : आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन :
१) या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard वर व पालकांसाठी https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर Interim Answer key (अंतरिम उत्तरसूची) या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
३) त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. ०९/०१/२०२६ ते दि. १६/०१/२०२६ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दिनांक १६/०१/२०२६ विहित मुदती नंतर त्रुटी आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.
५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
६) उपरोक्तनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा : १६/०१/२०२६ रोजी पर्यंत
📢 NMMS निकाल आणि कट ऑफ माहिती साठी आमच्या NMMS Scholar वेबसाइटला भेट देत रहा.
👉 NMMS Result 2025

0 टिप्पण्या